Breaking New
रंगशारदा इथं उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू | एका महिन्यात भगवी दिवाळी साजरी करू | यंदा सत्ता मिळवणारच, आदेश पाळण्याची शिवसेनेची प्रथा | राज्याचा विकास करायचाय, मला जनतेसाठी सत्ता हवी | शिवसेनाप्रमुखांचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करा |
21-09-2014, 9:36 pm
Sunday

punepolitics.com फोटो फिचर :

पुणे पॉलीटीक्स विशेष

वारे मतदारसंघातील

कोथरूड मतदारसंघ महायुतीची स्थिती भक्‍कम; राष्ट्रवादी, मनसे कमकुवत


शिवसेनेच्या बहुतांश विद्यमान आमदारांची उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच जाहीर केला आहे. त्यामुळे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार चंद्रकांत मोकाटे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून सर्वाधिक ९१ हजारांचे मताधिक्‍य मिळाल्याने महायुतीच्या उमेदवाराची स्थिती भक्कम राहणार आहे. या तुलनेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती तितकीशी भक्कम नाही. यामुळे या दोन्ही पक्षांत उमेदवारीसाठी अटीतटीची स्पर्धा दिसत नाही.   

राष्ट्रवादीकडे या मतदारसंघात ताकदवान इच्छुक उमेदवार नाहीत. महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे दोन वर्षांपासून तयारी करीत होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत खासदार अनिल शिरोळे यांना मिळालेल्या विक्रमी मताधिक्‍यामुळे चांदेरे यांनी माघार घेतल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे प्रमोद निम्हण आता इच्छुक आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या किशोर शिंदे यांनी गेल्या निवडणुकीत मोकाटे यांना जोरदार लढत दिली होती. शिंदे केवळ सात हजार २०० मतांनी पराभूत झाले होते. मात्र, मनसेची पाच वर्षांपूर्वी आणि आजच्या स्थितीत खूपच फरक पडला आहे. बदलत्या राजकीय वातावरणात शिंदे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. तसेच राम बोरकर, नगरसेवक राजाभाऊ गोरडे, राजाभाऊ बराटे, जयश्री मारणेही इच्छुक आहेत. गजानन मारणे हे मनसेतून इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. चंद्रकांत मोकाटे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात असली तरी शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार व शहराध्यक्ष श्‍याम देशपांडे उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.    
 
बदलाची शक्यता नाही
जागावाटपावरून शिवसेना व भाजपमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे भाजपमधील काही जणांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मुरलीधर मोहोळ, मेधा कुलकर्णी यांचा यात समावेश आहे. गेल्या काही निवडणुकांत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला, मात्र या मतदारसंघात राहणारा बहुतांश मतदार भाजपचा पारंपरिक मतदार आहे. कोणत्याही परिस्थितीत महायुती तुटणार नाही, अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याच्या या मतदारसंघात कोणताही बदल होण्याची शक्‍यता दिसत नाही.

पोलिस आणि अग्नीशामक दलातील अधिका-यांचा सन्मान